Home महाराष्ट्र ठाकरे सरकारची ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची- सदाभाऊ खोत

ठाकरे सरकारची ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची- सदाभाऊ खोत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : अतिवृष्टिग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कालच्या कॅबिनेटमध्ये 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यावरुन शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापूर आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अतिवृष्टिग्रस्तांसाठी लगोलाग पॅकेज जाहीर करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. पण आता त्यांनीच 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या जीआरची 20 तारखेला मी होळी करणार आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा- मनसेसोबत युती बाबत देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

‘ठाकरे सरकारची ऐट राजाची अन् वागणूक भिकाऱ्याची’ अशी अवस्था आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. लवकरच मी सरकारविरोधात किसान परिषद घेणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद होणार आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जाती किंवा वर्गाचा नाही- पंकजा मुंडे

…तर आज शिवसेनेचे 56 आमदार भाजपमध्ये असते; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट

राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ