मुंबई : एकीकडे राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सतत मोठी भर पडत आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनावरील लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करावे लागले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजपच्या 105 आमदारांना महाराष्ट्रातील जनतेनंच निवडून दिलंय. मग, या 105 आमदारांना मतदान दिलेले लोकं कोण आहेत. जो शब्द तुमच्या लोकांनी वापरलाय, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
दरम्यान, तुम्हांला निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या, ज्यांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे, ते कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र जेवढा तुमचा आहे, तेवढा आमचाही आहे. महाराष्ट्राची जनता जेवढी तुमची आहे, तेवढी आमचीही आहे. सगळ्यांचा आहे हा महाराष्ट्र, असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“ज्यांचं तोंड फाटलेलं आहे त्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही”
मुख्यमंत्री ‘मातोश्री’मधून बाहेर पडत नाही, ते कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार?; नारायण राणेंचा सवाल
मोठी बातमी! 11 एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली!
महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत