मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: ट्विट करत नाना पटोलेंनी याची माहिती दिली आहे
विधासभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सध्याच्या काळात कोही दौरे केले होते. यानंतर त्यांना लक्षणं जाणवू लागली. त्यांनी तातडीने कोरोनाची टेस्ट करून घेतली असता त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.
दरम्यान, गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये, असं नाना पटोले म्हणाले.
गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये, /2
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 4, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची विनंती
महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, जे करायचंय ते करा- कंगणा रणाैत
कंगनाला RPI संरक्षण देईल, शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही – रामदास आठवले
…तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत; ‘या’ शिवसेना आमदाराचा कंगणा रणाैतला इशारा