मुंबई : केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यावर काँग्रेस नेते व मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
फक्त राज्यांना अधिकार देऊन काही फायदा होणार नाही. तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढणं गरजेचं असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडी सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशी झाली आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी यावेळी लगावला. महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचंच नाही. ज्यावेळी राज्यांना अधिकार हवा होता त्यावेळी ते मागणी करत होते. आता केंद्र सरकारनं निर्णय घेतला तर त्यावरही टीका केली जात आहे. केंद्र सरकारची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे. त्यामुळे 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. मात्र, राज्य सरकारची हतबलता असल्यामुळे ते आरक्षण देऊ शकत नाहीत, असा टोमणा दरेकरांनी यावेळी लगावला.
दरम्यान, आरक्षण देण्याची भूमिका आणि धाडस अशोक चव्हाण यांच्यात नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं. केंद्र सरकारनं आता निर्णय दिला असल्यामुळे राज्य सरकार हात वर करत आहे, अशी टीकाही दरेकरांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं दु:खद निधन”
मोठी बातमी! आरक्षणासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय; आरक्षणाचा अधिकार राज्यांना मिळणार
रोहित पवारांच्या ‘त्या’ फोनची कोल्हापूरमध्ये चर्चा
….त्यासाठी लवकरच राज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहे- चंद्रकांत पाटील