अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?; आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्याविरोधात एकेरी भाषा

0
1536

मुंबई : NCR  हा कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली आहे.

हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असा घणाघात आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

शिवसेना सध्या ऐवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल, असं टीकास्त्रही आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सोडलं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय विद्यार्थी चळवळ दशा आणि दिशा या विषयावर बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्लीत प्रचाराला बोलावलं अण् चिठ्ठ्या वाटायला लावल्या; चंद्रकांत पाटील ट्रोल

शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली- रामदास आठवले

महाराष्ट्रात NRC कायदा लागू होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत भारताने रचला इतिहास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here