आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’वर जात होते. मात्र माध्यम प्रतिनिधींनी पाहिल्यानंतर त्यांनी ही भेट घेणं टाळलं.
आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या घरी न जाता बाहेरुनच आपला मोर्चा माघारी वळवला. सिल्व्हर ओकवर मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणीच्या निवडणुकीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला BCCI चे माजी सचिव प्रोफेसर रत्नाकर शेट्टी, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. पी व्ही शेट्टी आणि आशीष शेलारही उपस्थित राहणार होते.
हे ही वाचा : शिंदे गट-मनसे युती होणार?; राज ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…
दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कमालीचा राजकीय संघर्ष सुरू असताना आशीष शेलार यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असता म्हणून त्यांनी ही भेट टाळल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, आगामी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी मनसे-शिंदे गट युती होणार?”