जयपूर : फसवणूक, खंडणी, बलात्कार अशा विविध आरोपांखाली सध्या तुरूंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूंना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून आसाराम बापूंना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. 3 मे रोजी त्यांंची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर 5 मे रोजी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना आयसीयुमध्ये दाखल केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही, हे विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे”
“माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन”
राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे- रामदास आठवले
महाराष्ट्र सरकारने आता तरी मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्यावा- चित्रा वाघ