“लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवताय?”

0
868

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लंकेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो, असा घणाघात मेहबूब शेख यांनी यावेळी केला. ते पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

अहो चित्रा वाघ, लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, असो जोरदार हल्लाबोल मेहबूब यांनी यावेळी केला. तसेच महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?, राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा, असंही मेहबूब शेख यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“करूणा मुंडे यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल”

धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने रिव्हाॅल्व्हर माझ्या गाडीत ठेवली; करूणा मुंडेंचा आरोप

आता मी विचारते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?; महिला सरपंच मारहाण प्रकरणी चित्रा वाघ संतापल्या

“राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here