आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षांचे नेते देत आहेत. सध्या महाराष्ट्रात लोकांमध्ये ताणतणाव आहे. तसेच भाजपादेखील खूप तणावग्रस्त आहे. त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असेल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची आधीपासूनच थट्टामस्करी करण्याची सवय आहे. आजही त्या पद्धतीने त्यांनी गंमत केली. शेवटी ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार असल्याचा विश्वास त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसे गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर- किरीट सोमय्या
शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडावं- रामदास आठवले
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता मनसेचाही विरोध
“…तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल”