आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षात भ्रष्टाचार व गोंधळामुळे राज्यात प्रशासन कोसळले आहे. खुलेआम मोगलाई अवतरली आहे. सरकारचे शेतकरी, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, अनुसूचित जाती – जमाती, विद्यार्थी, कामगार अशा कोणाकडेच लक्ष नाही. कोविडसह सर्व विषयात हे सरकार अपयशी ठरले आहे. संधी मिळाली तर राज्यातील जनता या सरकारला फेकून देतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाल्या…
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बेफिकीरीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे राज्यातील प्रशासन कोसळले आहे. राज्याच्या एका पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर शंभर कोटी वसुलीचा आरोप केला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने चौकशी सुरू केली. न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि बरेच दिवस ते परागंदा होते. आरोप करणारे पोलीस आयुक्तही परागंदा होते. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
आमच्या कामावर अमित शहा समाधानी- चंद्रकांत पाटील
“राऊतांच्या मुलींच्या लग्नात संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल”
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे आमचं सरकार येणार- प्रविण दरेकर