आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारात ईडीच्या रडारवर असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज 102 दिवसांनी जामिनावर सुटका झाली.
पीएमएलए कोर्टाने जामीन दिल्यानंतर आता संजय राऊत यांचा जेलबाहेर यायचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमएलए कोर्टाने दिलेल्या जामिनाविरोधात ईडीने हायकोर्टातही धाव घेतली, पण हायकोर्टाने पीएमएलए कोर्टाचा निर्णय योग्य ठरवला.
हे ही वाचा : तानाजी सावंत म्हणाले, आदित्य ठाकरे कोण आहेत?; आता आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…
दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचं समजताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण राऊत कोठडीत असल्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचं थेट बोलणं होऊ शकलं नाही. मात्र संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केला. संजय सावंत या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या फोनवर उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटणार आहे, असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिला. संजय राऊत यांनाही उद्धव ठाकरेंचा निरोप मिळाल्यानंतर, धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीवर बोलताना, मनसे नेत्याची जीभ घसरली, म्हणाले…
“ठाण्यात जोरदार राडा; जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडलेला हर हर महादेव चा शो, मनसेकडून पुन्हा सूरू”
शिंदे सरकार कधी कोसळणार?; आदित्य ठाकरेंनी सांगितला मुहूर्त, म्हणाले…