Home महाराष्ट्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही ज्यांना आमदार आणता येत नाही, त्यांच्याबद्दल…; शरद पवारांचा राज...

हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही ज्यांना आमदार आणता येत नाही, त्यांच्याबद्दल…; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले असून आज प्रथमच उध्दव ठाकरे गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेत आहेत. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

कितीही मेळावे घेतले तरी तुमच्याकडे मुळात विचार आहे का? असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “शिवसेनेची गत शरद पवारांच्या प्राणिसंग्रहालयातल्या पिंजऱ्यामधील मांजरासारखी झाली आहे. हे सगळे आऊटडेटेड नेतृत्व आहे. संभाजीनगरमधले सगळे नेते असेच आहेत. दानवे असतील नाही तर खैरे असतील.” असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची नाशिकमध्ये येण्याआधीच हकालपट्टी

हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना लोक विधीमंडळात आणता येत नाही, त्यांच्याबद्दल काय बोलायचे? असा टोला शरद पवारांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला. मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठान सेंटरमधील पत्रकार परिषदेत शरद पवाऱ बोलत होते

दरम्यान, राज ठाकरेंचा चंद्रपूर दौरा आणि चित्ते भारतात येण्यावर पत्रकारांनी विचारला असता, त्यावर पवारांनी, मी लोकांच्या प्रश्नांवर लक्ष देतो. या असल्या गोष्टीत फारसे बघत नाही., असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची नाशिकमध्ये येण्याआधीच हकालपट्टी

प्रसिद्ध उद्योजक गाैतम अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट; तासभर खलबतं, चर्चांना उधाण

शिवसेनेची गत शरद पवारांच्या पिंजऱ्यामधील मांजरासारखी झालीये; मनसेची टीका