भाजपच्या ‘ह्या’ खासदाराने केलं अरविंद केजरीवाल यांचं कौतुक

0
252

नवी दिल्ली दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट व्हायला हळूहळू सुरूवात झाली आहे. राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. यावर भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर स्तुती सुमनं उधळली आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी आणलेली मोफत वीज योजना गरीब मतदारांना आवडली, असं रमेश बिधुडी यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

भाजप कार्यकर्ते केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले असते तर दिल्लीतील निकाल वेगळा लागला असता, असंही रमेश बिधुडी म्हणाले.

दरम्यान, देशद्रोह्यांना गोळ्या घाला म्हणणं यात काहीही वाईट नाही, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

 

भाजपच्या अहंकाराचा दिल्लीकरांनी पराभव केला; शिवसेनेचे भजपवर टीकास्त्र

“दिल्लीच्या जनतेने भाजपला नाकारत देशद्रोही जाहीर केलं”

“ती आपल्यातून निघून गेली, पण तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here