आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

0
160

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व वडनेराचे आमदार रवी राणा यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतलं आहे. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, म्हणून रवी राणा यांनी आंदोलन केले तर त्यांना कारागृहात डांबले. शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन ‘मातोश्री’वर भेटण्यासाठी रेल्वेने निघाले, तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध केलं. 25-50 हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“निवेदन स्वीकारुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली असती. त्यांचे दुःख समजून घेतले असते, तर किमान आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे तर समाधान शेतकऱ्यांना मिळाले असते. आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का?”, असा सवालही फडणवीसांनी  केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले; बीड अ‍ॅसिड हल्ल्यावरुन नितेश राणेंची टीका

“नवनीत राणा आणि रवी राणा पोलिसांच्या ताब्यात”

“प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळणाऱ्या बीडच्या नराधमाला नांदेडमध्ये अटक”

“महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारूण पराभव”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here