Home महाराष्ट्र “हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करून लाज वाटली नाही का?

“हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करून लाज वाटली नाही का?

मुंबई : बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभवाची धूळ चारत भाजपने बेळगाव महापालिका ताब्यात घेतली. या विजयानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

105 हुतात्म्यांमध्ये बेळगावमधील मराठीसुद्धा आहेत. पेढे वाटत आहात मराठी माणूस हरल्यामुळे, लाज नाही वाटत तुम्हाला? राजकारण बाजूला ठेवा; पण मराठी माणूस म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला.

बेळगावचा पराभव राऊतांच्या जिव्हारी लागला आहे. पण राऊतांनी बेळगावात मराठीचा नारा देऊन चूक केली आहे. पराभाव झाल्या नंतर त्यांना पेढे खाल्याचे आठवलं. मला एकच गोष्ट संजय राऊतांना विचारायचं की, ज्या मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा काँग्रेसने सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना त्यांना लाज वाटली नाही का? काँग्रेसशी हात मिळवणून करून त्यानी हिंदुत्वाचा अपमान केला नाही का? असा सवाल प्रसाद लाड यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

माझा मुलगाही खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळतो; मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं

…तरच राज्यात सत्ताबदल होऊ शकतं; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल; नाना पटोलेंचा टोला

अनिल देशमुखांबाबतची भूमिका राष्ट्रवादीने स्पष्ट करावी- केशव उपाध्ये