आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पक्षातील अंतर्गत कलहामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असून त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. त्यामुळे त्या लवकर पक्षाला रामराम करतील, अशा अनेक चर्चांनी जोर धरला होता. यावरून आता पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपण पक्षात नाराज नसल्याचं पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं. पंकजा मुंडेंनी न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्या बोलत होत्या.
हे ही वाचा : मोठी बातमी! अशोक चव्हाण आणि फडणवीसांची गुप्त भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मला सर्व चर्चाच व्यर्थ वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व मंत्रिमंडळातील नेत्यांचे चेहरे एका रांगेत लावा, त्यात माझाही फोटो लावा. माझ्या चेहऱ्यात काही कमी फ्रेशनेस आहे का? मी अत्यंत फ्रेश आहे. नाराज असण्याचं काही कारणच नाही? मी रुसणे किंवा नाराज होणे, या फार वैयक्तिक गोष्टी आहेत. त्या सार्वजनिक आयुष्यात किंवा राजकीय आयुष्यात पुढे आणायच्या नसतात, या विचारात मी वाढलेली आहे, असंही पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
अमित शाह घेणार राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीची चिन्हे
बापू, महाराष्ट्रात करमणूक बंद करा, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या; शिवसेनेचा टोला