आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात राजकारण चांगलचं तापलं आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : …अन् चक्क भाजप खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पहा व्हिडिओ
आदित्य ठाकरे विधानसभेत येत असताना पायरीवर आंदोलन करत असलेल्या नितेश राणे यांनी म्याव म्याव करून डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधला याला उत्तर म्हणून नितेश राणेंनीही डुकराचा एक फोटो ट्विट केला होता. “ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण?”, अशा ओळी नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोसोबत लिहिल्या होत्या. या प्रकरणात आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी उडी घेत नितेश राणेंवर हल्लाबोल केला.
‘कोंबड्यांना मांजर केलं जात असल्याचं मी टीव्हीवर पाहत आहे. अशाने कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का? कोकणाचा विकास होणार आहे का? असा टोला अजित पवारांनी नितेश राणेंना लगावला. ते आज रत्नागिरी दाैऱ्यावर होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणानं चालत असल्याचं अजित दादांनी आज सिद्ध केलं- रूपाली पाटील”
संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; अजित पवारांचा राणेंना टोला
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिर्घायुष्यासाठी पायी बालाजीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू “