मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सध्या अडचणीत आलेले सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
एपीआय सचिन वाझे यांचं राज्य सरकारने केलेलं निलंबिन म्हणजे गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्य ही गेलं, अशी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची अवस्था झाली आहे, असं म्हणत अतुल भातखळकरांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान, आम्ही विधान सभेतच ही मागणी केली होती. पण जे सत्य दिवसाढवळ्या दिसत होतं. ते नाकारण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे राज्याची अब्रू पुर्ती गेली. याला जबाबदार मुख्यमंत्री आणि महाभकास आघाडी आहे, असंही अतुल भातखळकर म्हणाले.
अखेर एपीआय सचिन वाझे निलंबित. महा भकास आघाडीची अवस्था म्हणजे गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्य ही गेलं… pic.twitter.com/UN8UAwntxQ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही- रोहित पवार
“मोठी बातमी! सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली, उपचारासाठी जे.जे.रूग्णालयात हलवलं”
माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
“प्रसिद्ध चित्रकार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लक्ष्मण पै यांचं निधन”