दुबई : आजच्या आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान राॅयल्सचा 46 धावांनी पराभव केला.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 184 धावा केल्या. दिल्लीकडून शिमरन हेटमाटरने 24 चेंडूत 45 धावा केल्या. तर मार्कस स्टाॅयनिसने 30 चेंडूत 39 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 3, तर कार्तिक त्यागी, अॅणड्रयू टाय व राहूल टेवटियाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात खराब झाली. सलामीला आलेल्या यशस्वी जैसवाल व जाॅस बटलरने 2.3 षटकात 15 धावांची सलामी दिली. मात्र बटलर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अश्विनच्या गोलंदाजीवर शिखर धवनकडे झेल देऊन आऊट झाला. बटलरने 8 चेंडूत 13 धावा केल्या. बटलरनंतर आलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथ व जैसवालने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली. पण सेट झालेला स्मिथ धावगती वाढवण्याच्या नादात नाॅर्त्झेच्या गोलंदाजीवर हेटमायरकडे झेल देऊन आऊट झाला. स्मिथने 17 चेंडूत 24 धावा केल्या. स्मिथनंतर आलेला संजू सॅमसनही केवळ 5 धावांवर आऊट झाला. त्यानंतर आलेला महिपाल लोमरोरही केवळ 1 धावांवर आऊट झाला. लोमरोर सेट झालेला जैसवालही आऊट झाला. जैसवालने 36 चेंडूत 34 धावा केल्या. नंतर आलेला अॅणड्रयू टायही केवळ 6 धावांवर आऊट झाला. त्यामुळे राजस्थानची 13.5 षटकात 6 बाद 90 अशी अवस्था झाली. जोफ्रा आर्चरही मोठा फटका खेळण्याच्या नादात आऊट झाला. मात्र राहूल टेवटिया अजून मैदानात होता. राहूलने 16 व्या षटकात एक चाैकार व एक सिक्स मारत 13 धावा वसूल केल्या. आता राजस्थानला 3 षटकात विजयासाठी 64 धावांची गरज होती. 17 व्या षटकात श्रेयस गोपाल आऊट झाला व याच षटकात 8 धावा निघाल्या. आता राजस्थानला 12 चेंडूत 56 धावांची गरज होती. 18 व्या षटकात केवळ 7 धावा निघाल्या. आता राजस्थानला 6 चेंडूत 49 धावांची गरज. 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राहूल टेवटिया रबाडाच्या गोलंदाजीवर बोल्य झाला. टेवटियाने 29 चेंडूत 38 धावा केल्या. तर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. चाैथ्या चेंडूवर विकेट. दिल्लीने 46 धावांनी विजय मिळवला.
दिल्लीकडून कगिसो रबाडाने 3, रविचंद्रन अश्विन व मार्कस स्टाॅयनिसने 2 , तर नाॅर्त्झे, हर्षल पटेल, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
एकनाथ खडसे भाजपतून जाणे महत्त्वाचे, मग ते कोणत्याही पक्षात गेले तरी आनंद- गुलाबराव पाटील
MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; राज्य सरकारची घोषणा
राजा रयतेचा असतो, तलवार कुणाविरोधात उपसणार?- विजय वडेट्टीवार
दिल्ली कॅपिटल्सचे राजस्थान राॅयल्सपुढे 185 धावांचे लक्ष्य