आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात केला आहे.
गेल्या 2-3 महिन्यांपासून किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा होत्या. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या 13 वर गेली आहे.
हे ही वाचा : “सुप्रिया सुळेनंतर, आता आदित्य ठाकरे, भारत जोडो यात्रेत आज राहुल गांधींसोबत चालणार”
दरम्यान, गजानन किर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिमचे लागोपाठ दोनवेळचे खासदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा गटनेते राहुल शेवाळे आणि गजानन किर्तीकर हे एकाच कारमधून मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरला येथे गेले. व तिथे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
संजय राऊत म्हणाले, शिवसेना बाळासाहेबांची, आता गुलाबराव पाटील म्हणतात…
खानाच्या कबरीवरील कारवाईचं संभाजीराजेंकडून स्वागत, म्हणाले…
स्वत:ची तुलना सावरकर-लोकमान्यांशी, मात्र त्यांनी…; मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल