भाजपचा शिवसेनेला अणखी एक धक्का; मुंबईत अनेक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

0
492

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सत्ताधारी शिवसेनेला हादरे देण्यास सुरूवात केली आहे.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शिवसेनेचा गड म्हणून ओळख असलेल्या मुंबईत मोठा हादरा दिला. मुंबईच्या चेंबूर येथील सचिन वाडेकर यांच्या नेत्तृत्वात मोठ्यासंख्येने शिवसैनिकांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला.

दरम्यान, यावेळी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्र, राज्याच्या सर्वांगीण विकासाठी प्रतिज्ञाबद्ध होत पक्षाच्या मूळ तत्व, धोरणाशी एकनिष्ठ राहण्याचा संकल्प केला. शिवसैनिकांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसणार, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…म्हणून कंगना रणौतने आलिया भट्टला फटकारलं”

‘हे तर अपरिपक्वतेचं लक्षण’; मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावरुन फडणवीसांची टीका

संजय राऊत माझे मित्र, त्यांनी मानहानीची किंमत वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा टोला

कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत भाजपला मोठे यश मिळणार- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here