Home महाराष्ट्र ‘औकातीच्या बाहेर घोषणा करायची अन्…’; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला

‘औकातीच्या बाहेर घोषणा करायची अन्…’; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : शिवसेनेने उत्तरप्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवण्याची घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशात 80 ते 100 जागा लढवू अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधलाय.

“24 तासांत शिवसेनेच्या 303 जागा कमी करून उत्तर प्रदेश निवडणुकीत 100 जागा लढवण्याची संजय राऊतांनी घोषणा केली आहे. औकातीच्या बाहेर घोषणा करायची आणि मग वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा. पक्ष असाच चालवतात आणि राज्य सरकारही. मधल्यामध्ये सत्यानाश मात्र जनतेचा होतो आहे.” असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या उत्तरप्रदेश राज्य कार्यकारिणीची 10 सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यानंतर बैठकीत भाजपाला धडा शिकवण्यासाठी राज्यातील 403 जागांवर निवडणूक लढवणार, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

बाळासाहेबांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता हरपला- अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचं निधन

“भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड”

शरद पवार यांनी सहकुटुंब घेतले मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वरील बाप्पाचे दर्शन