‘या’ तारखेपासून अण्णा हजारे करणार राळेगणसिद्धीत उपोषण

0
355

राळेगणसिद्धी : राळेगणसिद्धीत, संत यादवबाबा मंदिरात 30 जानेवारीपासून आंदोलन करणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हजारे यांनी जाहीर केलं आहे.

2011 मध्ये दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनादरम्यान भाजपचे नेते संसदेत माझ्या समर्थनार्थ भाषणे ठोकत होते. मागण्या कशा योग्य आहेत, हे संसदेत पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वेळी केलेली भाषणे केवळ सत्ता मिळवण्यासाठी होती का, असा सवाल करत अण्णा हजारेयांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

दरम्यान, उपोषणाच्या वेळी या भाषणांची ध्वनिचित्रफीत प्रसारित केली जाणार असल्याचे हजारे यांनी सांगितले. हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळवले आहे, असं अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव किती ठिकाणी द्यायचं याचा निर्णय घ्या”

महाविकास आघाडीवर जनतेचा ठामपणे विश्वास आहे- आदित्य ठाकरे

…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…- अतुल भातखळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here