Home नागपूर लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच- अण्णा हजारे

लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच- अण्णा हजारे

अहमदनगर : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना एन्काउंटरमध्ये पोलिसांनी ठार केलं आहे. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केलं आहे.

‘देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच आहे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

काही सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच आहे. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींनाही अद्याप फाशी झालेली नाही, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

हैदराबादच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जात होते. जर ते यशस्वी झाले असते तर त्यांच्याकडून पुन्हा असाच गुन्हा घडला असता तर त्याला जबादार कोणाला धरले असते? आपल्या देशाची घटना सर्वोत्तम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वंकश विचार करून घटना तयार केली आहे. मात्र, या घटनेच्या चौकटीत राहून लवकर न्याय मि‌ळत नसेल तर अशा पोलिस चकमकीला योग्यच म्हणावे लागेल,’ असं हजारे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

सोनी कंपनीने केला ‘हा’ नवा कॅमेरा लाॅँच

मारुती सुझुकीने कंपनीने परत मागवल्या तब्बल 63,493 गाड्या

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून विजय

कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण स्वागतार्ह वाटतो- राज ठाकरे