…आणि मविआ सरकार राज ठाकरेंना तुरूंगात डांबेल- चंद्रकांत पाटील

0
417

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : 1 मे महाराष्ट्र दिना रोजी औरंगाबाद येथे केलेल्या भाषणासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राज ठाकरेंसोबत सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या सभेचे व्हिडीओ पाहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंना अटक होणार की काय?, यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहेत. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हनुमान चालिसा वाचणं राजद्रोह ठरवणारं मविआ सरकार खासदार-आमदार दाम्पत्याला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय. काहीही करून हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे. या परिस्थितीत कोर्टानं आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळं काय होणार?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

बेकायदा भोंग्याच्या आवाजानं होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आक्षेप असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. हे भोंगे काढण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल”

“गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून, बाबरीच्या ढांच्यावर…; शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here