“मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अनोळखी कार, अपघात थोडक्यात वाचला, ठाकरे स्वत: चालवत होते गाडी”

0
517

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाहनाचा ताफा राजभवनाकडून वर्षा बंगल्याकडे जात असताना अचानक त्यांच्या ताफ्यात एक अनोळखी कार घुसल्याची घटना घडली. मलबार रोडवर ही घटना घडली.

मुख्यमंत्री ठाकरे काल संध्याकाळच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर गेले होते. तिथून परत येत असताना त्यांच्या ताफ्यात अचानक एक अनोळखी कार घुसली. या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

हे ही  वाचा : ‘शिवसेना उमेदवाराला मत द्या, अन्…; शिवसेनेकडून अपक्ष आमदाराला ऑफर?

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री ठाकरे स्वतः गाडी चालवत होते. सुदैवाने ताफ्यातील सर्वच गाड्यांचा वेग कमी असल्याने ताफा थांबला. संबंधित गाडी पुढे गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुन्हा मार्गस्थ झाला. त्यामुळे मोठा अपघात थोडक्यात वाचला.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यात देवगिरी बंगल्यावर खलबतं: चर्चांना उधाण

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवारांसोबत काय घडलं?; देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा, म्हणाले…

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here