रोहित पवारांनी फडणवीसांवर केलेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी होणार

0
450

अहमदनगर : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अहमदनगरमध्ये टँकर घोटाळे झालेत. असा आरोप राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर या प्रकारची चौकशी करणार, अशी ग्वाही अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना झालेल्या टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामं, टँकर पाणीपुरवठा, तसंच चारा छावण्यांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार रोहित पवार यांनी केली होती. या तिन्ही आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे ग्वाही दिली.

महत्वाच्या घडामोडी-

राजिनामा देताच सांगलीच्या महपौर संगिता खोत यांना झाले अश्रू अनावर

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‌ॅरोन फिंचने रोहित आणि विराटचं कौतुक

शिवसेनेने आम्हाला तशी कोणतीही ऑफर दिली नव्हती- नवाब मलिक

…म्हणून झाली उर्वशी रौतेला ट्रोल

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here