Home महाराष्ट्र अमृता वहिणींनी पुण्यावर नाही, तर गाण्यावर काम करावं; रूपाली चाकणकरांचा टोला

अमृता वहिणींनी पुण्यावर नाही, तर गाण्यावर काम करावं; रूपाली चाकणकरांचा टोला

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधात राज्य सरकारने सुट दिलेली नाही. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

पुण्याचा पाॅझिटीव्हीटी रेट हा 4 टक्के असताना पुणे का सुरू झालं नाही, हे मला समजत नाही. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा, असं अमृता फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली.

रुग्ण संख्या आटोक्यात आहे म्हणून घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करायचं आणि पुन्हा रुग्ण संख्या वाढली की सरकारवर खापर फोडायचं, असं डबल ढोलकी वाजवण्याचं काम अमृता वहिनींचं चालू आहे. त्यामुळे पुणेकरांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगण्यापेक्षा वहिनींनी आपल्या गाण्याच्या छंदावर काम केलं तर बरं होईल, असा टोला रूपाली चाकणकरांनी अमृता फडणवीसांना यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“41 वर्षानंतरचा वनवास आज संपला..’वेल डन बॉईज’; चित्रा वाघ यांच्याकडून भारतीय हाॅकी संघाचं काैतुक”

“अमृता फडणवीसांना काही काम नाही, त्यामुळे भाजपनं त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी”

महापुराच्या नावाखाली शिवसेनेकडून मुंबईत नवी वसुली मोहिम- निलेश राणे

कोण अमृता फडणवीस?, ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था झालीये- किशोरी पेडणेकर