Home महाराष्ट्र अमृता फडणवीस म्हणाल्या, पुरी कायनात अब देवेंद्रजी के साथ है; आता शिवसेना...

अमृता फडणवीस म्हणाल्या, पुरी कायनात अब देवेंद्रजी के साथ है; आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी काल मतदान झालं. या निवडणूकीत भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या निकालावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचं काैतुक केलं. अब देवेंद्रजी, अकेले नही, पुरी कायनात उनके साथ है, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी पतीवर काैतुकांचा वर्षाव केला. यावरून आता शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा; अमृता फडणवीसांची मागणी

कालची निवडणूक ही जनतेची नव्हती. या निवडणूकीत घोडेबाजार झाला, हे नक्की. आकडेवारीच्या आणि घोडेबाजाराच्या विजयानंतर इतकं हुरळून जाऊ नका, असा टोला किशोरी पेडणेकरांनी अमृता फडणवीसांना यावेळी लगावला.

मुख्यमंत्री हे जनतेचे राजे कधीच नसतात, ते जनतेचे सेवक असतात. राजा बिजा तुमच्या घरी ठेवा. मुख्यमंत्री जनतेचे काम करत आहेत. ते जनतेला ठरवू द्या. तुम्ही ठरवू नका. सतत बोलून नेहमी चर्चेत राहण्याची सवय काही लोकांना आहे. राज्यसभेच्या एका निवडणूकीने हरळून जावू नका. कोण काफी आहे, कोण भारी आहे, हे कळेल. दुसऱ्याच्या कामाचं परिमार्जन तुम्ही नाही करू शकत. विकास कोण करत आहे, हे गेली अडीच वर्ष लोकांना माहीत आहे, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला मतदान केलं असतं; खासदार नवनीत राणांचा धक्कादायक दावा

औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर गुडघे टेकून काय मिळालं? मनसेचा शिवसेनेला सवाल

शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…