महिला पत्रकाराबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंना, अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

0
293

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंढरपूर : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी काल केलं होतं. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : शिंदे गटातील ‘हा’ नेता आमच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा मोठा गाैफ्यस्फोट

संभाजी भिडे गुरुजींचा आदर आहे. ते हिंदुत्वाचा स्तंभ आहेत. पण महिलांनी काय करावं, कसं जगावं, हे कोणी सांगू नये”, असा टोला अमृता फडणवीसांनी यावेळी संभाजी भिडेंना लगावला. अमृता फडणवीस आज पंढरपूरात विठूमाऊलींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान, म्हणाले, आधी कुंकू लाव, मग…”

पहिलीच वेळ असल्याने माफ करतो म्हणणाऱ्या बच्चू कडूंना, रवी राणांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

“मोठी बातमी! संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here