Home महाराष्ट्र अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस; म्हणाल्या, जाहीरपणे माफी मागा नाहीतर…

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस; म्हणाल्या, जाहीरपणे माफी मागा नाहीतर…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आर्यन खान अटक प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे.

या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है, अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्यक्तीचं नाव जयदीप राणा असं असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे., यावरून आता अमृता फडणवीसांनी पलटवार केला आहे.

हे ही वाचा : “जळगावमध्ये भाजपकडून शिवसेनेला खिंडार, शेकडो शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश”

मलिकांच्या या आरोपानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी मलिकांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पुढील 48 तासांत मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा. नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असा इशारा अमृता फडणवीसांनी दिला.

‘नवाब मलिक यांनी काही फोटोंसह बदनामीकारक, दिशाभूल करणारे, अपमानास्पद ट्विट केले आहेत. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली फौजदारी कारवाईसह बदनामीची नोटीस देत आहे. मलिक यांनी बिनशर्त सार्वजनिक माफी मागून 48 तासांत ट्विट हटवावेत किंवा कारवाईला सामोरं जावं’

महत्वाच्या घडामोडी –

आता कुठे गेला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एसटी कर्मचाऱ्यांबद्दलचा पुळका?; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती; कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य

साहित्य संमेलन गीतात सावरकरांचा उल्लेख नाही, संयोजकांनी चूक सुधारावी; मनसेची मागणी