जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची जालन्यात भेट झाली. या भेटीमुळे अमोल कोल्हे यांच्या भाजपमध्ये प्रवेशच्या चर्चा रंगल्या आहेत.
जालना येथे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्याहस्ते मंत्री व खासदार रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर दानवे व कोल्हे यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही समोर येत आहे.
हे ही वाचा : निवडणुकांपूर्वीच अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा
औरंगाबाद येथे 23 ते 28 दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्य होणार आहे. याचं निमंत्रण देण्यासाठी अमोल कोल्हेंनी ही भेट घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, याभेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या घडामोडी –
खुजगाव ग्रामपंचायत निडणुकीमधे “शिट्टी” वाजण्याची दाट शक्यता…
हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे-भाजप सरकार कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
“मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर, वसंत मोरेंच्या ‘या’ कट्टर समर्थकानं शिंदे गटात केला प्रवेश