आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. यावेळी उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांचं दिलखुलास स्वागत केलं.
अमित ठाकरे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीसाठी ते साताऱ्यात आले आहेत. यावेळी त्यांनी उदयनराजे यांची भेट घेतली.
अमित हा माझ्या खास मित्राचा मुलगा आहे. अमित घरी आल्यावर मला माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंच्या हृदयातून प्रेमाचे झरे वाहतात; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने उधळली स्तुतीसुमने”
केवळ अमितच नाही. बाकी इतर तरुणांनीही राजकारणात पुढे आलं पाहिजे. या तरुणांच्या हातून लोकांची सेवा झाली पाहिजे. ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे. प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब असतील. राज ठाकरे असतील. या सर्वांचा नावलौकिक त्यांनी केला पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. त्यांची फॅन फॉलोईंग जोरात आहे, असंही उदयन राजे भोसले म्हणाले.
दरम्यान, मला सांगितलं अमित येणार आहे. मी म्हटलं येऊ दे. म्हटलं क्लपबिलप तरी करतो. पण राहिलं. कारण अमित तरुण आहे. त्यांच्याशी मॅच तरी झालो पाहिजे. तुम्ही दिसाल गोंडस पण मी छानच दिसतो… हम भी कुछ कम नही… असं उदयनराजे म्हणले, त्यानंतर एकच हशा पिकला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
‘…तर भाजपसोबत युती करायला तयार आहोत’; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य