आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना मारेगाव तालुक्यातील कलावती बांदूरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला घर, वीज, शौचालय, आरोग्य या सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या, असं म्हणत राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता.
या प्रकारानंतर कलावती बांदूरकर यांनी अमित शहा यांचा दावा खोडून काढत आपल्याला राहुल गांधी यांच्यामुळेच सर्व मदत मिळाल्याचे सांगत केंद्र सरकारला खोटे ठरवलं होतं. आता या सर्व प्रकरणावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी ठाकरे – शिंदे गट आले पुन्हा एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमित शहांसारख्या मोठ्या नेत्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करण्याची गरज आहे. यामुळे भाजपा पक्ष अडचणीत येतो, असं बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
पहिल्यांदा राहुल गांधींनी मुर्खपणा केला. कलावती यांना घर बांधून देणं ही विटंबना होती. सामान्य लोकांचा छळ करण्यासारखं ते होतं. तुमचं सरकार असताना धोरण आखलं पाहिजे होतं. फक्त कलावती यांच्या घरी जाऊन वीज, घर द्यायचं, हे तर डिवचण्यासारखी पद्धत होती. करोडो लोक रांगेत उभी असताना एखाद्यासाठी उदार व्हायचं आणि बाकीच्यांच्या हाती भोपळा द्यायचा,, असं बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, आता त्यापेक्षा मोठा मुर्खपणा अमित शाहांनी संसदेत केला. अमित शाहांनी संसदेत कलावती यांना वीज, घर दिल्याचं सांगितलं. पण, ‘जे काही दिलं, ते काँग्रेसने दिलं,’ असं कलवती यांनी म्हटलं आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांनी खोटं बोलताना थोडं विचार करण्याची गरज होती. त्यामुळे भाजपा पक्षाच्या अडचणीत वाढ होते. प्रत्येक गोष्टीत हे खोटं बोलतात, असा प्रचार झाला आहे. विरोधकांना नवीन संधी अमित शाहांनी दिली आहे,, अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडूंनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“पंतप्रधानांबद्दलचं ‘ते’ विधान भोवलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला लोकसभेतून केलं निलंबित”
…तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडणार; बच्चू कडूंचा इशारा