मुंबई : एका ऑनलाइन पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्याशी गप्पा मारताना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच यादरम्यान, फडणवीसांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.
2014-2019 दरम्यान राज्यामध्ये भाजप शिवसेनेबरोबर युती करुन सत्तेत नसती तर कारभार अधिक चांगला आणि वेगवान झाला असता. असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
ज्या पक्षाबरोबर युती होती त्याच पक्षाबरोबर सत्ता संघर्ष होत असल्याने तुम्हाला राज्य सोडून केंद्रात जाता येत नाहीय का असा प्रश्न मिलिंद देवरा यांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी, त्या 5 वर्षांमधील कारभार सुरळीत झाला असला तरी तो त्रासदायकही होता, असं उत्तर दिलं.
दरम्यान, शिवसेना जरी सत्तेमध्ये होती तरी सरकारने काही निर्णय घेतल्यानंतर ते स्वत:ला विरोधी पक्षाच्या भूमिकेत नेते टीका करायचे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा; याेग्य ती काळजी घेऊन सण साजरा करू
आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही; फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट अजित मोहन यांचं स्पष्टीकरण
वीज बिलात ग्राहकांना सूट मिळणार; राज्य सरकारचा प्रस्ताव तयार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाचा धक्का; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश