आबांच्या सुपुत्रासोबत आता पत्नी सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण

0
244

सांगली : दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर आर पाटील (आबा) यांच्या कुटुंबातील 2 जणांना कोरोनाची लागण झाली होती. सुपुत्र रोहित पाटील तसेच आबांचे भाऊ सुरेश पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आबांची पत्नी व राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

पुत्र रोहित पाटील आणि दीर सुरेश पाटील या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सुमनताई पाटील यांची स्वॅब तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. पण काल (शनिवारी) रात्री उशिरा आलेल्या त्यांच्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शनिवारी तिघांनाही उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले असून सुमन पाटील यांच्यासह तिघांचीही प्रकृती ठीक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी भेटले?; एकनाथ खडसेंचा सवाल

अपयशाचं खापर देवावर फोडणं हे कसलं हिंदुत्व?; संजय राऊतांचा अर्थमंत्र्यांना सवाल

खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही- आदेश बांदेकर

“एकनाथ खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here