आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी केली, आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून युतीत प्रवेश केला. यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत.
ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीच्या फुटीवर अखेर शरद पवारांकडून शिक्कामोर्तब, म्हणाले…
ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! सकाळी शरद पवारांच्या बैठकीला हजर राहणाऱ्याने ‘या’ आमदाराने दिला, अजित पवारांना पाठिंबा”
“अजित पवारांच्या शपथविधीच्या दिवशी नेमकं काय घडलं?; ‘या’ आमदाराने सांगितला सविस्तर घटनाक्रम”
अजित पवार यांच्यासोबत युतीनंतर भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर