आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. भाजपने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर विजय मिळवता आला. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
हे ही वाचा : नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करायचंय- रामदास आठवले
विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे, असंही राणेंनी यावेळी म्हटलं. तसेच आता पुढील लक्ष्य राज्यातील सत्ता असल्याचंही राणेंनी यावेळी म्हटलं. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकलेल्या नाहीत. जिल्हा बँक निवडणुकीत 25 मतदार, 50 मतदार त्यांचे अपहरण करणे, त्यांना पैसे देणे, एखादी बँक जिंकल्यावर संपूर्ण राज्य जिंकण्याचे आवाहन करत आहेत. हे म्हणजे असं झालं की, गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणत आहेत की आम्ही वर्ल्डकप जिंकू, असा टोला नवाब मलिकांनी राणेंना लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
मंत्री, आमदार कोरोनाबाधित; राज्यात कठोर निर्बंध लागणार का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी”
“शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास?; काँग्रेस नेत्याचा टोला