मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. किरीट सोमय्या अलिबागमध्ये आंदोलन करत असताना पोलिसाकडून ही कारवाई करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या करत होते. यावेळी ही कारवाई करण्यात आली.
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी जमिनीवरील 19 मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही, या प्रकरणाची चौकशी करा या मागणीसाठी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होते. यावेळी त्यांनी पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता अडवून धरला होता. पोलिसांनी कारवाई करत रात्री आठच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतलं.
जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जोवर दिले जात नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली होती.
दरम्यान, कोर्लईत जमीन घोटाळा झाल्याचं खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं आहे. मग यात दोषी कोण आहे याची चौकशी व्हायला हवी, 12 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली मालमत्ता 2 कोटीत कशी खरेदी करण्यात आली. हे या चौकशीतून समोर यायला हवे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी
“गिर गये तो भी टांग उपर, अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था”
मोठी बातमी! साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग
एका वर्षात नेमकं काय बदललं?; हिंगणघाट प्रकरणावरुन चित्रा वाघ यांचा सवाल
…त्यामुळे हे शरजीलचं सरकार आहे- देवेंद्र फडणवीस