राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना, अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

0
237

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कर्नाटकमधील प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याची खोचक टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमचा पक्ष जर साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असेल तर देवेंद्र फडणवीसांनी आमची चिंता करू नये, अशा शब्दांत अजित पवार यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी; भाजप संपर्कातील ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

“ठीक आहे. त्यांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचं कारण नाही. जर 36 जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यातले असू तर मग त्यांच्यासमोर कुणी विरोधकच दिसत नाही. कारण शिवसेनेची त्यांनी ती अवस्था केली. आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातलेच आहोत. काँग्रेसबद्दलपण ते तेच म्हणत असतात. काँग्रेस संपवली पाहिजे अशीच भाजपाची वक्तव्यं असतात, असं अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे; जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here