Home महाराष्ट्र शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही असं वक्तव्य करत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मला त्या धमकीबद्दल काही माहित नाही मात्र त्या धमकीला घाबरण्याचं कारण नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राजकारणात कोणी कोणाला धमकी देण्यात काही अर्थ नसतो. कदाचित कार्यकर्त्यांना बरं वाटावं, ते आपल्यासोबत रहावेत यासाठी कोणीतरी काहीतरी बोललं जातं. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?- आशिष शेलार

“शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून दाखवावं, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये”

हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा- उद्धव ठाकरे

माझी वाट लागली तरी चालेल, पण ‘त्याला’ संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही- शिवेंद्रराजे भोसले