आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकले आहेत. यावर सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यालयाचे उद्घाटनादरम्यान मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.
“ईडी, सीबीआय आणि इतर काही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. अजित पवार यांच्या कुटुंबियांवर पडलेल्या छापेमारीमध्ये केंद्र सरकारचा किंवा भाजपाचा कसलाही हस्तक्षेप नाही. या यंत्रणा स्वतंत्र आहे. या छाप्यांनी अजित पवार यांना फारसा फरक पडणार नाही.” असं रामदास आठवले म्हणाले.
हे ही वाचा :“काँग्रेसमध्ये नव्या नियुक्तींमुळे नाराजी; सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा”
दरम्यान, ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी २० ऑक्टोबर रोजी राज्यात सर्व तहसील कचेरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करणार असल्याची घोषणाही रामदास आठवले यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए?, असं विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरून राऊतांचा टोला
भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे; शिवसेनेच्या ‘या’ नेताचा आक्रमक पवित्रा