अजित पवार यांनी काढला उदय सामंत यांच्या सोबत फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
279

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.अशातच आज विधानभवन परिसरात एका प्रसंगाची जोरदार चर्चा सुरु आहे. ती म्हणजे, विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या फोटोची.

आज सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी सर्व आमदार विधानभवन परिसरात जमा झाले होते. यावेळी अजित पवार यांनी उदय सामंत यांना बोलावून फोटो काढला. यावेळी या फोटोसाठी दोघांनी मस्त पोझही दिली.

हे ही वाचा : जयंत पाटीलसे जो टकरायेगा, उसका करेक्ट कार्यक्रम हो जाएगा; विधानसभेत विरोधी पक्षाची जोरदार घोषणाबाजी

यावेळी पवार-सामंत यांनी दबक्या आवाजात काही संवादही केला. इतकेच नाही आता तर, हा फोटो पाहून एकनाथराव…. , असं अजित पवार यांनी उदय सामंत यांना मिश्किलपणे म्हटलं. याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या दोघांनीही सोबत फोटो काढल्यामुळे या प्रसंगाचे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“धक्कादायक! सांगलीत खाजगी रूग्णालयात, रूग्णावर जादुटोण्याने उपचाराचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद”

भ्रष्टाचारांच्या आरोपांवर नारायण राणेंचा धक्कादायक दावा, म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून, एकनाथ शिंदेंनी…

“राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं सावट?; आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत दिली अपडेट, नवी नियमावली जाहीर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here