Home महाराष्ट्र “अजित पवारांनी रडणं बंद करावं, त्यांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत”

“अजित पवारांनी रडणं बंद करावं, त्यांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं गेल्या 4 दिवसांपासून छापेमारी सुरु आहे. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी रडणं बंद करावं. अजितदादांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत, असा दावा निलेश राणेंनी यावेळी केला. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

आहे त्या पदावर राहून माझ्यावर अन्याय होतो असं अजित पवार सांगतात. तुमच्यावर अन्याय कसला झाला? किती वर्ष मंत्रीपदावर आहात? तुमच्या मंत्रीपदाचा महाराष्ट्राला किती फायदा झाला? म्हणून अजित पवार यांनी रडणं बंद करावं. जास्त दिवस शिल्लक नाहीयेत आता. अजित पवारांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीयेत आता, असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

बंद पुकारने ही महाविकास आघाडीची चुकीची भूमिका- रामदास आठवेले

राणें कुटूंबियांकडून शिवसेनेला मोठा धक्का; सिंधुदुर्गमध्ये 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

देगलूर पोट निवडणुकीसाठी वंचित आघाडीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मनसेच्या नेत्यांची भाजपसोबत युतीची मागणी