आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा आमच्यासोबत यावं, असं मोठं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.
‘देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत, तर अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा,’ असं विखे पाटील म्हणाले.
हे ही वाचा : …तर नारायण राणे दोन वेळा पराभूत झाले होते; मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा जोरदार पलटवार
विखे पाटील आणि पवार कुटुंबियांत कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. त्यातून राजकीय मतभिन्नता आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, लोणी इथल्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने विखे पाटील यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी विखे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी विखे पाटील बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेेंनी सत्तेतून बाहेर पडून, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे- रामदास आठवले
“आगामी निवडणूकीच्या आधी मनसेकडून शिवसेनेला मोठे खिंडार, अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत प्रवेश”
2024 ला कोल्हापूरातून संजय पवार आमदार असतील फक्त शिवसेनेनं त्यांना…; तृप्ती देसाईंचं मोठं विधान