मुंबई : कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणे हीच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका. ती गावं महाराष्ट्रात आलीच पाहिजे पण तुम्ही ते करू शकत नाही कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही, असं निलेश राणे म्हणाले.
दरम्यान, इतक्या वर्षात कधी गेलात काय त्या गावांना भेट देण्याकरिता? ते सीमाभागात कधी गेले हे अजित पवारांनी जाहीर करावं?, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.
अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका. ती गावं महाराष्ट्रात आलीच पाहिजे पण तुम्ही ते करू शकत नाही कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही. इतक्या वर्षात कधी गेलात काय त्या गावांना भेट देण्याकरिता? जाहीर करावं अजित पवारांनी ते सीमाभागात कधी गेले?https://t.co/1V5f9Sbzh4
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 17, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी शरद पवारांनी ‘या’ तंत्राचा खुबीने वापर केला”
“हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?”
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच- संजय राऊत
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन