Home पुणे “अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण ते टिकवता येत...

“अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण ते टिकवता येत नाही”

पुणे : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत, मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव…. कितीदा सांगायचं की हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, असं प्रत्युत्तर दिलं होतं. आता यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

अजित पवार यांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती आहे. पण ते टिकवता येत नाही. 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र ड्रावरमधून कुणी काढलं? राज्यपालांना कुणी सांगितलं की 54 आमदारांचा पाठिंबा आहे? अशाप्रकारे सरकार बनवणाऱ्यांनी खरं तर जपून बोललं पाहिजे, असं पलटवार चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

“सह्याद्री अतिथीगृहाच्या स्लॅबप्रमाणे सरकार कधी कोसळेल हे कळणार नाही”

कितीही हजारांचा पोलिस बंदोबस्त असू दे, मोर्चा निघणारच- विनायक मेटे

संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी वेळ दिला पाहिजे- जयंत पाटील