आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीतील फुटीला 15 दिवसही उलटले नाही तोच राष्ट्रवादीचे अजित पवारांसह सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तब्बल तासभर ही भेट झाली. या नेत्यांनी शरद पवार यांना काही विनंती केली. पण शरद पवार यांनी त्यावर काहीच भाष्य केलं नाही. यावेळी सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतलं. आम्ही चुकलो असं म्हणत माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे.
ही बातमी पण वाचा : “भावांना झाडाला बांधून, हल्लेखोरांकडून मारहाण, त्यानंतर महिलेला भर रस्त्यात केलं विवस्त्र अन्….; अक्कलकोटमधील संतापजनक घटना”
दरम्यान, या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत या भेटीमागचं कारण सांगितलं. राष्ट्रवादीतून फुटून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेला एक गट शरद पवार यांच्या भेटीला आला होता. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली. मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सर्व नेते अचानक भेटायला आले होते. नंतर मला बोलावलं, अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवार-अजित पवार भेटीवर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला, अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड
राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप?; भर पत्रकार परिषदेत अजित दादांनी पुन्हा मारला डोळा, चर्चांना उधाण”