आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच इचलकरंजीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रातील सत्ता एकदा माझ्या हातात द्या, अन्…; राज ठाकरेंचं मोठं विधान
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी बस स्थानकात मनसेनं आंदोलन करत कर्नाटक गाडीच्या समोर निदर्शने केली. महाराष्ट्रात कर्नाटकची एकही गाडी फिरू देणार नाही असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे.
दरम्यान, कन्नड रक्षण वेदिकेने बेळगावात केलेल्या राड्याचा मनसेनं तीव्र निषेध केलाय. महाराष्ट्रातील मनसे आता जशास तसे उत्तर देणार, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी मांडली.
महत्त्वाच्या घडामोडी –
विराट मोर्चा काढत आहेत त्यांना…; मुख्यमंत्री शिंदेंचं, ठाकरेंना प्रत्युत्त
“महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात आता ठाकरे रस्त्यावर; ‘या’ तारखेला महाविकास आघाडीचा विराट मोर्चा”
मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; थेट अजित पवारांकडून ऑफर