आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर भाजप सोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे हे आज प्रथमच गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेत आहेत.
मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को संकुलावर गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील सत्तांतरानंतर गटप्रमुखांना एकत्रितपणे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे संबोधणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा : राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; शिवसेनेची टीका
दरम्यान, ज्या परिसरात हा मेळावा होतोय, तेथील माजी नगरसेवकांनी मेळाव्यासाठी खास प्रकारचे टीशर्ट तयार केले आहेत. या टी-शर्टवर उद्धव साहेब, आम्ही तुमच्यासोबत असं लिहिण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचं बळ आणखी वाढणार; ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर?”
“शिवसैनिकच आगामी निवडणुकीत शिंदेला गटाला जागा दाखवतील”
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नंबर वन; तब्बल 22 ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात